विनाकारण फिरणाऱ्याचे एन्टीजेन टेस्ट, सावलीचे तहसीलदार यांनी राबविला मिशन.


      विनाकारण फिरणाऱ्याचे एन्टीजेन टेस्ट,
   सावलीचे तहसीलदार यांनी राबविला मिशन.

एस.के.24 तास

 सावली : कोविड १९ नियंत्रणासाठी सावलीचे तहसीलदार मा. परीक्षित पाटील यांच्या संकल्पनेतून ‘मिशन ब्रेक द चेन’ राबविण्यास सुरुवात झाली असून तपासणी, विलगीकरण आणि उपचार हि त्रिसूत्री नजरेसमोर ठेवून तत्पर कार्यवाही करण्यात येत आहे. या अनुषंगाने  तालुक्यातील वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाला आळा घालण्यासाठी व्याहाड खुर्द येथील बसस्थानक ला लागून असलेल्या शासकीय विश्रामगृह च्या पटांगणात आज दि. १९/५/२१ ला विनाकारण फिरणाऱ्याची अँटीजेन टेस्ट करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.या मिशन मध्ये व तपासण्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा सातत्याने प्रयत्न केल्या गेल्या आहे. अँटीजेन टेस्ट ही आरटी - पीसीआर टेस्टच्या  तुलनेत प्रक्रियेच्या दृष्टीने सुविधाजनक व सोप्या पध्दतीची टेस्ट असून याव्दारे साधारणत: ३० मिनिटात तपासणी अहवाल प्राप्त होत असल्याने रुग्ण शोधासाठी व पॉझिटीव्ह रुग्णाचे त्वरीत विलगीकरण करुन पुढे प्रसारित होणारी  संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. याशिवाय अँटीजेन टेस्टव्दारे त्वरीत अहवाल प्राप्त होत असल्याने तपासणी केंद्रावर होणारी  गर्दी टाळली जाते,  नागरिकांचा वेळ वाचतो व लवकरात लवकर टेस्ट झाल्याने  जास्तीत जास्त व्यक्तींच्या तपासण्या करणे शक्य होते. अशा प्रकारे विश्वासाने आपले कर्तव्य बजावतांना यावेळी दिसून आले. 

सदर या मिशन मध्ये एकूण १०० नागरिकांचे टेस्ट करण्यात आले. तर या टेस्ट मध्ये किसाननगर या गावातील एक व जिबगाव येथील एक असे दोन व्यक्तीं कोरोना पाझीटिव्ह निघालेत. या रुग्णांना पुढील उपचार करीता कोवीड केअर सेंटर सावली येथे पाठविण्यात आले. यावेळी मा.नायब तहसीलदार सागर कांबळे, एपीआय महेंद्र वासनिक, तलाठी मंगाम,सरपंच सुनिता उरकुडे, तंटामुक्ती अध्यक्ष डॉ.षडाकांत कवठे, स्वीटी गेडाम, वैशाली साखरकर,नीतू अडपल्लीवार,
कोल्हे सिस्टर, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व पोलीस कर्मचारी हे उपस्थित होते.   

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !