श्री.ह.भ.प. डुकरुजी पा किनेकार - (महाराज मार्कंडा देव) यांचे आज दु:खद निधन.

           श्री.ह.भ.प. डुकरुजी पा किनेकार -            (महाराज मार्कंडा देव) यांचे आज दु:खद निधन.

     नवनित कातलवार                                    सहसंपादक - एस.के.24 तास

 सावली :  चंद्रपूर जिल्ह्यातील सावली  तालुक्यातील टोकावर  नदीच्या काठावर वसलेले निलसनी पेडगाव या गावात डुकरुजी पा.किनेकार जन्म झाला.              त्यांचा स्वभाव मनमिळाऊ लोकांच्या हाकेला धावून जाणारे,गावात प्रतिष्ठित नागरिक म्हणून त्यांची ओळख होती.   

त्यांनी ग्राम पंचायत निलसनी पेडगाव येथे १५ वर्ष सरपंच पद चांगल्या प्रकारे त्यांनी पार पाडले.जिल्हा परिषद चंद्रपुर,सदस्य पदी सुद्धा त्यांनी चांगले सामाजिक कार्य केले. ते निलसनी पेडगाव ला सोडून गेले.

जिल्हा परिषद चंद्रपुर सदस्य,पद संपल्यावर श्री तुकाराम महाराज ( मार्कंडा देव ) येथे महाराज म्हणून कार्य करत होते. मात्र आज सकाळ ला त्यांचे दु:खद निधन झाले, त्यांच्या पश्चात एक मुलगा व परिवार आहे.

त्यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त सुरु आहे.

 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !