भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटना तर्फे जिल्हाभर जेलभरो आंदोलनाचा इशारा.

      भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटना            तर्फे जिल्हाभर जेलभरो आंदोलनाचा इशारा.

                     

                सुरेश कन्नमवार                                        मुख्य संपादक - एस.के.24 तास


चंद्रपूर : भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटना पोंभुर्णा तालुका शाखेच्या वतीने भारतीय क्रांतिकारी संघटना तथा दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा व इतर 5 जणावर दाखल केलेले  खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यासबंधाने पोंभुर्णाचे तहसीलदार याचे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.


         चिमूर येथील हिलींगटच मल्टीस्पेशालिटी हास्पिटल येथे खुलेआम कोरोना कोरोना पाॅझीटिव्ह रुग्णांकडून खुलेआम दारातच दीड ते दोन लाख रूपये व चुकीच्या पद्धतीने रुग्णांवर उपचार करून रुग्ण मारले जात आहे तसेच एका रुग्णाला एका दिवशी 17 ओ टू सिलेंडर तर दोन दिवसात 25 सिंलेडर लावली जात असल्याचा प्रकार भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा  यानी संबधित प्रशासनासमोर उघडकीस आणला. 


दि. ६/५/२०२१ ला जिल्हाधिकारी याचे आदेशानुसार हास्पिटल कोविड हेल्थ सेंटर ची मान्यता रद्द करून कोविड रुग्णांना दाखल करू नये असा स्पष्ट आदेशही बजावले असतांना नगर परिषदेचे मुख्याधिकारी, प्रशासकीय अधिकारी रणखांम, उपविभागीय अधिकारी प्रकाश सपकाळ, वैद्यकीय अधिक्षक डॉ भगत, पोलीस निरीक्षक शिंदे यांनी कानाडोळा करून हास्पीटल च्या संचालकाला पाठीशी घेऊन स्पष्ट शासनाचे आदेशाचे भंग केले.


         मरणाच्या दारात असलेल्या रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी हास्पिटल वर कारवाई संदर्भात शासनाचे आदेशाचे नगर परिषदेला व संबधित अधिकाऱ्याना निदर्शनास आणण्यासाठी वारंवार निवेदने /तक्रार भारतीय क्रांतिकारी संघटने द्वारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा, उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा, सांरग दाभेकर, कैलास भोयर, विलास मोहिनकर यांनी दिले माञ कोणत्याही प्रकारची न दखल घेतली नाही.


नगर परिषद येथे डझनभरहून अधिक कोविड मृत पावलेल्या रूग्णाची नोंद का केलेली नाही. किती मृत रूग्णाची नोंद केली. मृत झालेल्या रूग्णाच्या कुंटूबियानां मृत्यू प्रमाणापत्र देण्यास का टाळाटाळ करताहेत असे खडे बोल टेरेन्स कोब्रा, सारंग दाभेकर यानी सुनावले. अधिकाऱ्याद्वारे उडवाउडवीची उत्तरे दिली गेली समाधानकारक उत्तर न देता उलट पोलीस निरीक्षक यानां पाठिशी घेऊन बळजबरीने खोटे गुन्हे दाखल केले. 


अशा अधिकाऱ्याद्वारे अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या पोलीस निरीक्षक शिंदे यानां तात्काळ निलंबित करून भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा, उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा, सांरग दाबेकर, कैलास भोयर, विलास मोहिनकर, शैलेश भोयर याचेवरील दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अन्यथा भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटना तालुका पोंभुर्णा च्या वतीने जिल्हाभर ठिकठिकाणी उग्र आंदोलन करून हजारोंच्या संख्येने जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यानां निवेदनाद्वारे संघटनेने तालुका अध्यक्ष रफिक कुरेशी, तालुका सचिव अंविशांत अलगमवार, गयाबाई भलवे यांनी दिला.

 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !