मुल येथे अंत्यविधी करिता जडाऊ लाकूड उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीला यश. निखील वाढई,प्रणित पाल,आकाश येसनकर व युवा वर्ग मुल यांच्या मागणी ची वनविभाग प्रशासनाने दखल.

  मुल येथे अंत्यविधी करिता जडाऊ लाकूड उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीला यश.
 
निखील वाढई,प्रणित पाल,आकाश
येसनकरव युवा वर्ग मुल यांच्या मागणी ची वनविभाग प्रशासनाने दखल.

         नितेश मँकलवार
कार्यकारी संपादक - एस.के 24 तास

मुल : वनविभाग प्रशासनाने सदर तात्काळ दखल घेऊन जळाऊ लाकडे त्वरित उपलब्ध करून द्यावे तालुक्यातील जनतेची होणारी पंचाईत दूर करावी अन्यथा युवा वर्ग मूल तीव्र आंदोलन करणार असा इशारा देखील दिला होता. 
 
मूल तालुक्यांमध्ये माघील काही महिन्यापासून  जळाऊ लाकडांची मोठी टंचाई निर्माण झालेली होती. जडाऊ लाकडाच्या टंचाईमुळे अंत्यविधीला लाकडे उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना अंत्यविधी करता जळाऊ लाकूड सावली सिंदेवाई इथून आणावी लागत होती जळाऊ लाकडे आणण्याकरिता येण्या-जाण्याचा खर्च जास्त लागत होता याचा फटका गरीब वर्गावर बसत होता हि पंचाईत लक्षात येताच  निखिल भाऊ वाढई व मुल  युवा  वर्ग जडाउ लाकूड करिता मुल येथील चिचपल्ली बफर झोन इथे जडाऊ लाकूड करिता  मागणी  केलेली होती  .  
आज त्या मागणीची दखल घेऊन वन विभागाने नागरिकांना जडाऊ लाकूड उपलब्ध करून दिले निखीलवाढई,  प्रणितपाल, आकाश येसनकर  रोहित शेंडे यांच्या पुढाकाराने मुल येथे अंत्यविधी करिता लाकूड उपलब्ध झाले आहे.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !