गेवरा येथे वाघाच्या शोधार्थ वनपथकावर वाघाचा हल्ला, वनरक्षक जखमी.
एस.के.24 तास
सावली : तालुक्यातील सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत नियतक्षेत्र गेवरा मधील कक्ष क्रमांक १५४ मध्ये आज दिनांक १९/५/२१ रोजी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान वनकर्मचारी हे वाघाचा शोध व मागोवा घेण्यासाठी गेले असता गस्तीवर असलेल्या चमुवर वाघाने अचानक हल्ला करून संदीप चूधरी वनरक्षक गेवरा यांना जखमी केले आहे. सदर मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही बी कामडी,कोडापे क्षेत्र सहायक पाथरी, संदीप चौधरी वनरक्षक गेवरा, राकेश चौधरी वनरक्षक पालेबारासा, कु. पाल वनरक्षक खानाबाद, कु. शेंडे वनरक्षक पाथरी मोक्यावर उपस्थित होते.जखमी वनरक्षक तेव्हा यांचेवर उपजिल्हा रूग्णालय सावली येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे रवाना करण्यात आले आहे.काल दिनांक १८ ला तेंदू संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने झडप मारून तिला गंभीर जखमी केले होते.त्यामुळे आज सावली वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या नेतृत्वात सदर चमू गस्ती वर असतांना अचानक वाघाने हल्ला केला आहे.या परिसरातील जनतेनी जंगल भागात जावू नये असे आवाहन वनविभागने केले आहे.