पालकमंत्री वडेट्टीवार साहेब तुमच्या विधानसभा क्षेत्रात अख्खे गाव तापाने फणफणतेय.!

पालकमंत्री वडेट्टीवार साहेब तुमच्या विधानसभा क्षेत्रात अख्खे गाव तापाने फणफणतेय.!

                सुरेश कन्नमवार                           मुख्य संपादक - एस.के.24 तास

सावली : तालुक्यातील मेहा बुज हे अख्खे गाव तापाने फणफणत आहे. कोरोनाच्या भितीपोटी अनेकजण दवाखान्यात जाण्यास घाबरत आहेत. गावातील ७० टक्के लोक आजारी आहेत. दरम्यान आज शनिवारी शेख रहीम कुरेशी यांचा मृत्यू झाला. आता आठवडाभरात मृतांची संख्या ३ झाली आहे.

ही परिस्थिती पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील आहे, तर मग जिल्ह्यात काय असेल?

तालुक्यातील मेहा बु. हे गाव गत २ आठवड्यापासून तापाच्या साथीने हैराण झाले आहे. तापाच्या साथीने गावातील एकाचा पहिला बळी गेल्यानंतरही जीवघेण्या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केले. दीड हजार लोकसंख्या असलेल्या गावात आरोग्याची व्यवस्था नाही. कोरोनाची दहशत असताना गावात तापाची प्रचंड साथ आली असून, सर्व घरांमध्ये तापाचे रुग्ण आहेत. रुग्णालयात बेड मिळत नसल्याने भीतीपोटी अनेकजण कोरोना चाचणी करण्यास पुढे आलेले नाही. काही तरुणांनी स्वतःहुन चाचणी करून घेतली. पॉझिटिव्ह रुग्णांवर सावली येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. या ठिकाणी तातडीने आरोग्य सुविधा पुरविण्याची गरज आहे. गावात चाचणी शिबीर लावण्याची गरज आहे. ताप असल्याने अनेकांनी कोरोनाची लसदेखील घेतलेली नाही. हीच परिस्थिती शेजारच्या गावात आहे. या आठवड्यात आबाजी पेंदाम, हरबाजी कोलते, शेख रहीम कुरेशी यांचा मृत्यू झाला. गावातील ३ जण दगावल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात तापाची साथ येत आहे मात्र ग्रामीण नागरिक डॉक्टरकडे न जाता हा ताप देवीचा प्रकोप आहे, हा प्रकोप थांबविण्यासाठी ग्रामीण भागात सकाळच्या सुमारास माता मंदिरात नागरिक गर्दी करीत नैवेध चढवीत आहे, जिल्ह्यातील पालकमंत्री वडेट्टीवार यांनी या अज्ञात तापावर नियंत्रण मिळावे यासाठी काही नियोजन करायला हवं अन्यथा परिस्थिती चिघळू शकते.

अंतरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून विशेष शिबिर लाऊन आरोग्य तपासणी करण्यात येईल,

- विजय कोरेवार सभापती - पंचायत समिती,सावली

 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !