निलसनी पेडगाव येथे कोरोनातही खर्रा विक्री जोरात, ग्रामीण भागात इशारो इशारो मे खर्रा विक्री सुरु आहे

   निलसनी पेडगाव येथे  कोरोनातही खर्रा विक्री       जोरात, 

   ग्रामीण भागात इशारो इशारो मे खर्रा विक्री सुरु     आहे.

     नवनित कातलवार                                    सहसंपादक - एस.के.24 तास 

सावली : खरैवाला आपले ग्राहक सहज ओळखुन एकमेकांना इशारे करुन खर्रा ग्राहकापर्यंत पोहचवला जातो तर खर्रा चे पैसे जास्त मागीतले जाते. असा सगळा प्रकार निलसनी पेडगाव येथे आढळून आला आहे.

  हाच खर्रा रस्त्यावर थुकुन कोरोना प्रसारास हातभार लावणारे ग्रामीण भागात दिसत आहे. मात्र प्रशासन यावर अटकाव घालण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

  कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी १५ मे पर्यंत लाकडावुन कायम असुन पानठेल्यांवर बंदी कायम आहे .

 शासनाच्या आदेशानुसार खर्रा विक्री विक्री बंद असली तरी निलसनी पेडगाव खर्रा विक्रेत्यांनी एकाहून पर्याय शोधून काढले आहे,पानठेला बाहेरुन बंद राहतो व आतुन खरे दिले जात आहे. 

कोरोनाचे वाढते आकडे एकीकडे चिंता वाढविणारे असले, 

तरी प्रशासनाने आखुन दिलेल्या नियमांचे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याने कोरोनाचा धोकाही वाढला आहे,छुप्या पध्दतीने खर्रा विक्री सुरू असली तरी तो कुठे मिळतो हे कुणीही सांगु शकेल अशी स्थिती आहे

  मात्र प्रशासनाला हे दिसत नाही का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !