विजय वडेट्टीवार मित्र मंडळाकडून सावली कोविड सेंटरला बेडची मदत.
एस.के.24 तास
सावली : कोरोनाची वाढ तालुक्यात होत असल्याने अनेक व्यक्ती मदतीसाठी हात देत आहेत. त्यातच पालकमंत्री विजय वडेट्टीवार मित्र मंडळातर्फे 35 बेड सावली कोविड केअर सेंटरला देण्यात आले.
सावली तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्यात येत असल्याने या महामारीला थांबविण्यासाठी तहसीलदार यांनी जनतेला मदतीचे आवाहन केले. या आव्हानाला प्रतिसाद देत सावली तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते पालकमंत्री विजय वडेट्टीवार मित्रमंडळ जिल्हा खनिज विकास समिती सदस्य दिनेश पा. चिटनुरवार,पंचायत समिती सभापती विजय कोरेवार,संजय गांधी समिती अध्यक्ष राकेश गडमवार,निखिल सुरमवार,सुनील बोमनवार यांचेकडून सावली कोविड केअर सेंटरला 35 बेड देण्यात आले.