आजाराला कंटाळलेल्या अंगणवाडी सेविकेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या.
नितेश मँकलवार कार्यकारी संपादक - एस.के.24 तास
मुल : आजाराला कंटाळलेल्या एका पंचावन्न् वर्षीय अंगणवाडी सेविकेने शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना रविवारच्या सांयकाळी बेंबाळ पोलिस ठाण्यातंर्गत असलेल्या चकदुगाळा येथे घडली. मृतकाचे नाव शोभा लोमेश खोब्रागडे असे आहे. ही अंगणवाडी सेविका चकदुगाळा येेथेच कार्यरत होती.परंतु तीला बीपी आणि शुगरचा मोठा त्रास होता. औषधोपचार करूनही हा त्रास कमी होत नसल्याने ती कंटाळली होती.त्यामुळेच आजारामुळे उदविग्न अवस्थेतील मानसिक संतुलन बिघडलेल्या या अंगणवाडी सेविकेने घरापासून एक किमी अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीत उडी घेवून आपले जीवन संपविले. दुपार झाल्यानंतरही घरी न परतलेल्या या महिलेचा नातेवाईकांनी शोध घेतला असता शेतातील विहिरीत तिचा मृतदेह तरंगताना आढळले. या प्रकरणी बेेंबाळ पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास बेेंबाळ पोलिस करीत आहे.