रेती तस्करांची मुजोरी चालली वाढत,अभय कोणाचे ?

  रेती तस्करांची मुजोरी चालली वाढत,अभय    कोणाचे ?

        नरेंद्र मेश्राम 
जिल्हा प्रतिनिधी - भंडारा

लाखनी : तालुक्याला वरदान असलेली चुलबंद नदी तालुक्यामधुन वाहणाऱ्या चुलबंद नदीमुळे महाराष्ट्र शासनाच्या महसुल विभागाच्या तिजोरीत कोट्यवधी रूपयांची भर पडते.पण काही महीन्या पासुन चुलबंद नदीच्या रेती महसुल विभागा कडून अद्याप लिलाव झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महसुल विभागाच्या तिजोरीत कोट्यवधी रूपयांची झळ बसली आहे. अनेक महीन्यापासून चुलबंद नदीखोऱ्यातील रेती रात्रं दिवस रेतीतस्करांकडून चोरली जात आहे. परिसरातील रेती तस्करासाठी चुलबंद नदीचे घाट हे वरदान ठरले आहे .दिवसेदिवस या रेती तस्करांची मुजोरी वाढत चाललेली आहे. त्यामुळे या रेती तस्करांना अभय कोणाचे मिळाले आहे.असा सवाल सामान्य जनतेच्या समोर निर्माण होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसुल विभागाच्या दुर्लक्षीत पणामुळे रेती तस्करांचे आनंदाचे दिवस आले आहे. मागील काही महीन्यांपासुन रेती तस्करांवर कोणतीच कारवाई झाली नसल्यामुळे रेती तस्करांना रान मोकळे मिळाले आहे.त्यावर रेती दर आकाशाला भिडले आहे.अनेक रेती तस्कर लखपत्यांच्या पंगतीत बसले आहे.दरम्यान रेती तस्करांना चुलबंद नदी पट्टया ओळखीचा असल्याने परिसरात वाहणाऱ्या नदीची बारीक रेती अनेक ठिकाणी मुबलक असल्याने परिसरातील रेती तस्करांकडून ट्रॅक्टर मधून दिवस रात्रं रेती चोरटी वाहतूक केली जात आहे.एका चोरीचा रेतीच्या ट्रॅक्टर पाहणी करीता नदीघाटा पासून एक एक किलोमीटर च्या अंतरावरून रेती तस्करांची माणसे मोबाईलने संपर्क करीत असतात. या रेती तस्करांना महसूल विभागाचीआणि पोलीस विभागाची माणसे व गाडी यांची  माहीती आधीच यांना होत असते रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर हे दिवस रात्रं भर वेगात जात असतात त्या मुळे अनेकदा अपघातही झाले आहे.
परिसरात प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत अनेक बांधकामे सुरू असल्याने . रेतीची मागणीला वाढ झालेली आहे आणि याच संधीचे सोने करण्यासाठी रेती तस्करांनी कंबर कसली आहे सध्या या तस्करांकडून ट्रॅक्टरनी  तर काही बिना नंबरच्या ट्रॉली मध्ये चोरटी रेती वाहून नेली जात आहे .विशेष म्हणजे चुलबंद नदीचे सर्व घाट रेती तस्करांच्या वडिलोपार्जित मालकीचे असल्याच्या तोऱ्यात मज्जाव केला जात आहे.दिवसेंदिवस रेती तस्करांना कोणाचा आशीर्वाद असल्याच्या प्रश्न निर्माण होत आहे आता तर या रेती तस्करांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना दाखवण्याचे काम सुरू केले आहे.रेती तस्करांच्या वाढत्या मुजोऱ्या समोर कर्मचारी हतबल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याने भविष्यात रेती तस्कर प्रशासनावर भारी पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे प्रशासनाने वेळीच या रेती तस्करांच्या मुसक्या आवरण्याची मागणी केली जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !