तेंदु संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला,महीला गंभीर जखमी. * सावली तालुक्यातील गेवरा बीटातील घटना. * परिसरात भितिचे वातावरण.

तेंदु संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला,महीला गंभीर जखमी.

* सावली तालुक्यातील गेवरा बीटातील घटना.

* परिसरात भितिचे वातावरण.

एस.के.24 तास

सावली ( लोकमत दुधे ) : सावली वनपरीक्षेत्र अंर्तगत गेवरा परीक्षेत्रातील कक्ष क्रमांक 154 येथील जंगलात तेंदु पत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महीलेवर दबा धरून असलेल्या वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज दि (१८मे) रोजी सकाळच्या वेळेस घडली, शशिकला दिवाकर  चौधरी (४५) असे गंभीर जखमी झालेल्या महीलेचे नाव आहे तिला  गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.

सध्या सावली तालुक्यात तेंदुपत्ता संकलनाचे काम सुरु झाले आहे,जंगलव्यात भागातील महिला,पुरुष तेंदुपत्ता तोडण्यासाठी पहाटेच्या सुमारास जातात ,असेच आज सकाळी  गेवरा बिटातील कक्ष क्र १५४ मधील जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी काही महिला गेल्या असता गोसेखुर्द नहराच्या मुख्य धरणाला दबा धरुन बसलेल्या वाघाने शशिकला दिवाकर चौधरी नामक महिलेवर हल्ला करुन गंभीर जखमी केले,

सोबतच्या महिलेनी आरडाओरड केल्याने वाघ पळुन गेला ,जखमी महिलेला अंतरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले,नंतर प्रकृती बघुन गडचिरोली येथे हलविण्यात आले.

घटनेची माहीती वनविभागाला देण्यात आली, वनविभागाची टिम घटनास्थळी दाखल होऊन मौका पंचनामा करण्यात आली.

 या परिसरात नेहमीच वाघाचा वावर असतो, जंगलव्यात परिसर असल्याने वनविभागाने वन्य पशुचा बंदोबस्त करावा अशी मागणी गाव वासियांनी केली आहे.

सोबतच गरिब महिलेला आर्थिक मदत करण्याची सुध्दा मागणी संबंधित गाव वासियांनी केली आहे.

 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !