घेतले देवटोक येथे उत्खनात निघालेल्या शिव पिंडी चे दर्शन.


 जि.प.सदस्य संतोष तंगडपल्लीवार यानी परीवारा सोबत घेतले देवटोक येथे उत्खनात निघालेल्या शिव पिंडी चे दर्शन.


एस.के.24 तास


सावली : (राकेश गोलेपेलीवार) तालुक्यातील वैनगंगा नदीच्या उत्तर वहिनीच्या काठावर असलेल्या देवटोक येथे काल दिनांक 25 ला सायंकाळी 6 च्या दरम्यान नवीन मंदिर बांधकाम करण्यासाठी कॉलम चे जेसीपी च्या खोदकाम करीत असतानाच जवळपास अंदाजे 5 फूट लांबी व 1 फूट उंच ची पुरातन शिवपिंडी आढळून आली. त्या शिव पिंडी ची विधीवत पूजा करण्यात आली.शेकडो लोकांनी ही शिवपिंडी पाहण्यासाठी गर्दी केली होती. आज दिनांक 26 ला सायंकाळ च्या सुमारास माजी बाधकाम सभापती तथा जीप सदस्य संतोष तंगडपल्लीवार यांनी परीवारासह देवटोक येथे भेट देत पाहणी केली व पूजा अर्चना केली समवेत  ग्रा प सदस्य राकेश गोलेपल्लीवार जिबगांव,अकुश वरगटिवार ,प्रभारी सरपंच पुरुषोत्तम चुदरी, रुपेश पाल ,श्री पुण्यभूमी तीर्थक्षेत्र मुरकुंडेश्वर देवस्थान ट्रस्ट देवटोक(शिर्शी) चे अध्यक्ष संत मुर्लीधर महाराज याचे सह अनेक मंडळी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !