वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार.
◆ सावली तालुक्यातील दोन दिवसातील तिसरी घटना.सुरेश कन्नमवार मुख्य संपादक - एस.के.24 तास
सावली : आज दिनांक १९ मे सकाळी वनरक्षकावर झालेला हल्याची घटना ताजी असतांनाच व काल गेवरा येथील महिलेवर झालेला हल्ला ताजा असतांनाच ही सावली तालुक्यातील दोन दिवसातील तिसरी घटना उघडकीस आली आहे. रामजी आडकू मारबते वय ६० वर्षे गाव निफन्द्रा सरपणासाठी जंगलात गेले असता त्यांच्यावर वाघाने हमाला केला त्यात ते जागीच ठार झाले. पट्टेदार वाघाचा व्हिडीओ दोन दिवसापूर्वी सोशल मिडियावर प्रसारित झालेला होता. तालुक्यातील दोन दिवसातील तिसरी घटना असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. लवकरात लवकर या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सावली तालुक्यातील नागरिकांनी केलेली आहे.