दारू विक्रेत्याकडून पोलिसांवर हल्ला करून मारहाण
◆ दोन पोलीस गंभीर जखमी.
◆ आरोपी फरार.
सुरेश कन्नमवार मुख्य संपादक - एस.के.24 तास
सावली : पोलीस स्टेशन सावली अंतर्गतच्या मौजा किसान नगर येथे अवैध दारू विक्रेत्यांना पकडवयास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर दारू विक्रेत्या कडून हल्ला करून जबर मारहाण करण्यात आली असून या मारहाणीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात भरती करून उपचार करीत आहेत.
व्याहाड खुर्द ला लागून असलेल्या किसान नगर येथे पोलीस स्टेशनच्या वतीने गस्त लावण्यात आली. किसान नगर येथे गस्तीवर असलेल्या पोलिसांना दुचाकीने व्याहाड खुर्द कडे जाणाऱ्या जाणाऱ्या इसमावर संशय आला. संशयापोटी पोलिसांनी पाठलाग करून त्यांना अडवून दुचाकीची तपासणी केली तेव्हा त्या दुचाकीवर 15 लिटर मोहफुलांची दारू भरून असलेली कॅन आढळून आली. पोलिसांनी मोहफुलांची दारू अवैध रित्या विकणाऱ्या वर कार्यवाही करण्याची तंबी दिली.
तेव्हा मात्र दारू विक्रेत्यांनी 15 हजार रुपये घ्या पण दारू सोडा व केस करू नका असा आग्रह धरला पण पोलिसांनी ते मान्य न करता कार्यवाही करण्याची तंबी ही कायम ठेवली. यावेळेस अवैध दारू विक्रेत्यांनी घरी फ़ोन लावून स्वतःच्या मुलांना बोलावून पोलीस शिपायावर हमला करून मारहाण केले. त्या मारहाणीत पोलीस शिपाई गंभीर जखमी झाले. यावेळी पोलीस शिपाई यांनी पोलीस स्टेशन सावली चे ठाणेदार शिरसाट यांना माहिती देण्यात आली. पोलीस ठाणेदार शिरसाट यांनी पोलीस उपविभागीय मूल यांचेशी संपर्क करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस उपविभागीय मूल यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सावली व पोलीस स्टेशन पाथरी येथील पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफ्या सह किसान नगर येथे आरोपी ना पकडन्या करीता व अवैध दारू विक्रेत्यांचा शोध घेण्याकरिता आले असता तर त्यांचेवरही दगडफेक झाल्याचे असे सांगण्यात आले.
यानंतर आरोपीना पकडण्याची शोध मोहीम सुरु करण्यात आली. मोहिमे दरम्यान गावात फिरणाऱ्या काही नागरिकांनाही झळ पोहचावी असून गावात भीतीचे वातावरण संचारले आहे. सदर आरोपी फरार असून गरिबा मजोके, आकाश मजोके, दिलीप मजोके व अनोळखी व्यक्ती एक असे चार आरोपी असून सावली पोलिसांनी त्यांचेवर कलम 353, 324, 223, 504, 506, 34, भादवी 65 वि 83 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी फरार असल्याने अजूनही अटक करण्यात आलेले नाही. पोलीस ठाणेदार शिरसाट यांचे मार्गदर्शनात आरोपीचा शोध सुरु असून आरोपीना कधी अटक करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.