सावली तालुक्यातील कापसी ग्रामपंचायत सचिवाचा हेकेखोर पणा उजेडात.
एस.के.24 तास
सावली : तालुक्यातील ग्रामपंचायत कापसी अंतर्गत दोन वर्षा पासून म्हणजे 2019/20/21चे घरकुल पंतप्रधान आवास योजना. रमाई योजना अंतर्गत अनेक कामे सुरु आहेत. बेघर असलेल्या ना राहण्याची व्यवस्था व्हावे म्हणून विविध शासकीय योजना मधून घरकुल देण्यात येत असून ग्रामपंचायत कापशी येथे ही घरकुल काम सुरु असून मात्र शासकीय कर्मचारी असलेल्या सचिव मनोज नन्नावरे या ग्रामपंचायत सचिव यांनी तबल्ल घरकुल धारक लाभार्थी च्या झालेल्या कामाचे देयक प्रमाणपत्र माघ ण्यासाठी जाणाऱ्या लाभार्थी कडून प्रत्येक बिलाचे प्रमाणपत्र देताना 2000 रुपये मागितले जात असून सदर लाभार्थी सचिवाचं प्रकरण उजेडात आणलं असून सदर ग्रामपंचायत सचिवं यांनी वरिष्ठ अधिकारी यांना पैसे द्यावे लागतं असल्यामुळे दोन दोन हजार रुपये प्रत्येक बिलाच्या प्रमाणपत्र देताना घेत असल्यामुळे घरकुल धारक लाभार्थी यांनीनाराजी व्यक्त करीत सरपंच सौ,सुनीता काचिनवार यांना तक्रार देऊन सदर सचिव,मनोज नन्नावरे यांची चौकशी करून गुन्हा नोद करण्यासाठी मागणी जोर धरीत आहे अशा गोर गरिब जनतेला लुटणाऱ्या सचिवा वर तपास करून कारवाई करणण्यात यावे अशी चर्चा कापशी गावात सुरु आहे.
यावर वरिष्ठअधिकारी यांचे नाव समोर येत असल्यामुळे अधिकारी काय निर्णय घेणार की घेणार नाही ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.