भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवकाला शासनाचा दणका. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडून सेवेतून सक्तीने काढण्याचे चे आदेश.


भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवकाला शासनाचा दणका.


जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडून सेवेतून सक्तीने काढण्याचे चे आदेश.


एस.के.24 तास


सिंदेवाही : येथील पंचायत समिती अंतर्गत लाडबोरी ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक निखिल डांगे यांच्यावर जि.प.चंद्रपूर चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सक्तीने सेवेतून काढण्याची कारवाई केलीआहे.`


सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही`या म्हणी प्रमाणे शासकीय निधीत भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवक वर सक्तीने सेवेतून काढण्याची कारवाई झाल्यामुळे तालुक्यात बाकी भ्रष्टाचार करणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी याचे चांगलेच धाबे दणानलेले आहेत. सामान्य नागरिकांना त्रास देऊन गावातील विकास कामासाठी आलेल्या निधीत स्वतःचा व अधिकाऱ्यांचा आर्थिक लाभ व स्वार्थ बघून विकास निधीत अपहार करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाची गय केली जाणार नाही. हे जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राहुल कर्डिले सर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. 


निखिल डांगे हे चिमूर तालुक्यात तील खैरी या गावात ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक म्हणून रुजू असताना ग्रामसेवक निखिल डांगे यांच्यावर असलेले १ ते १४ नुसार पुढील आरोप आहेत व या मध्ये पूर्ण पणे दोषी असल्याचे विभागीय चौकशी च्या शिफारसी नुसार निलंबनाची कारवाई झाली आहे.निखिल डांगे ग्रामसेवक यांच्यावर असलेले आरोप 

१)७०% कर वसुली बाबत पंचायत राज च्या शिफारसी नुसार काम न करता नियमबाह्य काम केले होते. 
२) मागासवर्गीय निधी १५% मध्ये नियमबाह्य कामे केली. ३)ग्रामपंचायत मध्ये गावातील नागरिकांची घराची नोंदणी पती व पत्नी यांच्या संयुक्त नावाने केली नाही या मध्ये सुद्धा ते दोषी आहेत. 
४) खैरी गावात विकास कामाच्या बाबतीत जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले होते. 
५) ग्रामपंचायत मधील कामाची ५% टक्के रक्कम ग्राम निधीत जमा केली नाही.
 ६) गावामध्ये विविध कामा करिता प्राप्त झालेल्या निधीत गैर व्यवहार केला आहे.
 ७)बंधाऱ्याच्या बांध कामा मध्ये हजेरी पत्रकावर मजुराच्या सह्या न घेता जास्तीचे दिवस दाखवून मिळालेले रक्कम हडपली 
८) बंधारा बांधकाम व सिमेंट काँक्रिट रोड चे बांधकाम प्रमाणके नसताना अतिरिक्त खर्च दाखवून रक्कम हडपली आहे.
९)सामान्य फंडाचे नमुना २२ हजेरी पत्रकात मजुराच्या सह्या न घेता अतिरिक्त खर्च नोंदवून रक्कम हडपली आहे. 
१०) ग्रामपंचायत मध्ये साठा पुस्तक च ठेवले नव्हते.
११) १३ वा वित्त आयोग चा रेकॉर्ड आद्यावत ठेवला नाही.
१२) मागास वर्ग अनुदान निधी तून साहित्याचे व मजुरीचे प्रमाणके ठेवले नाही. 
१३) ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या कामात वेळेवर मजुरांना त्यांची मजुरी दिली नाही. 
१४) दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत मजुरांची मजुरी मजुरांना अदा न करणे, बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची नोंद साठा शासकीय रजिस्टर ला न घेणे,बांध कामासाठी गौण खनिजाचे वापर कमी प्रमाणात करणे, व गौण खनिजाची रक्कम शासन दरबारी जमा न करणे असे आरोप निखिल डांगे याच्यावर आहेत व हे सर्व आरोप विभागीय चौकशी मध्ये सत्य असल्याचे उघड झाले आहेत. पंचायत समिती सिंदेवाही मध्ये ग्रामपंचायत खातगाव व लाडबोरी मध्ये ग्रामसेवक निखिल डांगे यांची कारकीर्द वादग्रस्त स्वरूपाची आहे व खातगाव मधील ग्रामपंचायत बांधकाम व स्मशान भूमी शेड बांधकाम प्रकरणी गैव्यवहारप्रकरणी १ ते ४ नुसार पंचायत समिती स्तरावर सुरू आहे. या चौकशी अंती सुद्धा कारवाई होईलच पण अपहार केलेली रक्कम शासन दरबारी काय निर्णय लागेल याचा पाठपुरावा घेणे सुरू आहे.तसेच लाडबोरी मध्ये सुद्धा मनमानी स्वरूपाचा कारभार करून गावातील नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न ग्रामसेवक कडून होत होता. 



लाडबोरी ग्रामपंचायत मधील नवनियुक्त सरपंच व सदस्य ना शासकीय निधीचा हिशोब न देणे, ग्रामपंचायत मधील कमिटी ला विश्वास मध्ये न घेता परस्पर जवळीक ठेकेदार ला ठेका देणे असे प्रकार लाडबोरी इथे ग्रामसेवक करीत होते.ग्रामसेवक ह्याच्या अश्या वागणुकीने त्रस्त होऊन ग्रामपंचायत कमेटी ने पंचायत समिती मधील गट विकास अधिकारी व सभापती याच्या कडे तक्रार करून चौकशी मागणी लाऊन धरली आहे.
 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !