तेलात महागाईचा गोडवा गरोदर,स्तनदा माता यांच्या पोषण आहारातील “तेल” महागाईने हिरावल.


  तेलात महागाईचा गोडवा गरोदर,स्तनदा माता यांच्या पोषण आहारातील “तेल” महागाईने हिरावल.  
  

◆ एकात्मिक बालविकास प्रकल्पाची योजना.


एस.के.24 तास


सावली : एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजना हि आयसीडीएस कार्यक्रम केंद्र शासनाचे महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे चालविण्यात येणारा देशातील सर्वात मोठा आणि बहुउद्देशीय कार्यक्रम आहे. सदर कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1975 पासून राष्ट्रपिता महात्मा  गांधींच्या 106 व्या जयंती दिनी सुरू करण्यात आला आहे. आयसीडीएस प्रारंभिक बाल्यावस्थेतील काळजी व विकासासाठी एक वेगळा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये मागास, ग्रामीण, शहरी व आदिवासी क्षेत्रात राहणाऱ्या सहा वर्षाहून  कमी  असलेल्या बालकांच्या विकासासाठी व गर्भवती, स्तनदा माता आणि किशोरीसाठी एकत्रित आरोग्य विषयक व पोषण आहारच सेवा दिल्या जातात.

सदर ह्या योजना बालकांच्या योग्य मानसिक, शारीरिक, सामाजिक विकासासाठी पाया घालणे, सहा वर्षाखालील वयाच्या बालकांच्या पोषण व आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा घडून आणणे, मृत्यू, मानसिक असंतुलन, कुपोषण आणि शाळा सोडणाऱ्या बालकांच्या संख्येत घट घडवून आणणे, बालविकासाला प्रोत्साहन  देण्यासाठी विविध विभागामध्ये धोरण निश्चिती आणि कार्यक्रमाची  अंमलबजावणी करण्यासाठी प्रभावी ताळमेळ कायम ठेवणे, योग्य पोषण आहार व  आरोग्य  शिक्षण याद्वारे बालकांचे सामान्य आरोग्य व पोषणयुक्त आवश्यकतेबाबतची  काळजी घेण्यासाठी मातांना सक्षम व योग्य बनविणे हा त्यामागचा उद्देश असतो. 

एकात्मिक बाल विकास योजना (आयसीडीएस) मार्फत ग्रामीण, आदिवासी व नागरी क्षेत्रामधील गरोदर व स्तनदा माता यांना ६ महिने पोषण आहार, तर ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील मुलांना अंगणवाडी केंद्रा द्वारे पोषण आहार दिल्या जाते. त्यानंतर ३ वर्ष ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रातच पोषण आहार पदार्थ बनवून दिल्या जाते. सदर पोषण आहार महिन्यातून किमान २५ दिवसाचा व वर्षातून किमान ३०० दिवसाचा आहार देण्यात येतो. 


     सावली तालुक्यात एकात्मिक बाल विकास योजने अंतर्गत तालुक्यात एकूण १६८ अंगणवाडी आहेत, यामध्ये गरोदर माता एकूण ८१२ लाभार्थी, स्तनदा माता एकूण ६१९ लाभार्थी, तर ६ महिने ते ३ वर्ष बालशिशु एकूण ३३०० लाभार्थी आणि ३ वर्ष ते ६ वर्ष बालक एकूण ४१०० लाभार्थी इतके आहेत. या लाभार्थ्यांना पोषण आहार मध्ये तांदूळ १९०० ग्र̆म, गहू १९०० ग्र̆म, चना १९०० ग्र̆म, मुंग डाळ १००० ग्र̆म, मिरची पावडर एगमार्क २०० ग्र̆म, हळद पावडर एगमार्क २०० ग्र̆म, मीठ डबल फोर्टीफाईड ४०० ग्र̆म, साखर १००० ग्र̆म, याप्रमाणे खाद्यपदार्थ दिल्या जातात.  सध्या संपूर्ण देशात व राज्यात कोरोना च्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. मागील वर्षाच्या माहे मार्च अखेर पर्यंत गरोदर व स्तनदा माता आणि बालक यांना साखर एवजी तेल पॉकेट सह खाद्य पदार्थ मिळाले. परंतु यावर्षी एप्रिल महिन्या मध्ये सुरु झालेल्या लॉकडाऊन मुळे जीवनावश्यक वस्तूमध्ये महागाईने डोके वर काढले आहे. सदर हि महागाई जनसामान्य नागरिकांना जिव हेलणारी वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे. लॉकडाऊन मुळे व्यापारी, कामगार, रोजगार, अपंग, निराधार या सर्वांचे काम व रोजी बंद झाल्याने महागाईशी दोनहात करावे लागत आहे. या महागाईने गरोदर व स्तनदा माता यांच्या पोषण आहार मध्ये डोके वर काढलेला असून यावर्षीच्या एप्रिल महिन्यापासून गरोदर व स्तनदा माता यांना दिला जाणारा पोषण आहार मधून शासनाने महागाईमुळे तेल देण बंद करून त्याएवजी साखर दिल्या जात आहे. त्यामुळे गरोदर व  स्तनदा माता शासनाच्या तेलात महागाईचा गोडवा या हेतूपुरस्सर कारभाराने संतप्त नाराजी व्यक्त करीत आहेत. आम्हाला पोषण आहार मध्ये तांदूळ, गहू, चना, मुंगडाळ, मिरची पावडर, हळद पावडर, मीठ दिल्या जात आहे.


 परंतु तेलाशिवाय आम्ही बनवायचं कसा ? असा प्रश्न शासनाला करीत आहेत. सध्या कामधंधे, रोजी बंद असल्याने तेल १५६ रु. किलो झाल्याने इतका महाग आम्ही साधारण माणसांनी घ्यायचं कुठून असा सवाल करीत मातांनी शासनाला वेठीस धरत आहेत. शासनच जर या महागाईला घाबरून तेलाच्या एवजी ३६ रु. किलो ची स्वस्त साखर देत आहेत, तर या साखरे सोबत दुध आणि चहा पत्ती का देत नाहीत ? असाही प्रश्न मातांनी केलेला आहे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब यांनी चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठवली तर पर्यायाने हेच म्हनावे लागेल “वारे सरकार तेरा खेल स्वस्त दारू महंगा तेल” असा टोला मारत आम्हा मातांना तेल का देऊ शकत नाहीत असा सवाल यावेळी मातांनी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पालकमंत्री, प्रकल्प अधिकारी यांनी पूर्ववत आम्हाला ईतर पोषण आहार सोबत तेलाच वितरण करण्यात यावे अशी मागणी गरोदर व स्तनदा माता यावेळी केलेला आहे.     


गरोदर व स्तनदा माता यांची मागणी रास्त आहे, परंतु आम्ही शासनाच्या अधिपत्याखाली असून शासनाच्या नियोजना नुसार पोषण आहाराच वितरण केल्या जातो. त्यामुळे आमच्या कडे दुसरा पर्याय नाही. - एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी,सावली.)   


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !