गळफास घेऊन युवतीची आत्महत्या. मुरमाडी/दहेगाव शेतशिवरातील घटना.

            
   

गळफास घेऊन युवतीची आत्महत्या.
मुरमाडी/दहेगाव शेतशिवरातील घटना.  

एस.के.24 तास                                         

भंडारा : मोहाच्या झाडाला गळ्यातील ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदय   दायक घटना दिघोरी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मुरमाडी/दहेगाव येथे १४ मे रोजी रात्री ८ वाजता च्या सुमारास उघडकीस आली.मृतक युवतीचे नाव कल्याणी जनार्धन काळसर्पे (१६) रा. मुरमाडी तालुका लाखांदूर असे आहे. 
            घटनेच्या दिवशी सायंकाळी ६ वाजताचे सुमारास देव पुजेसाठी पळसाचे पान घेऊन येतो. असे आजीला सांगून ती घराबाहेर पडली. त्यावेळी तिचे आई-वडील मजुरीचे कामावर गेले होते.
रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता ती गावाबाहेरील मुरमाडी ते बारव्हा रस्त्यालगतच्या शेतशीवारातील मोहाच्या झाडाला स्वतःच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. कुटुंबीयांनी घटनेची माहिती दिघोरी पोलिसांना दिली. आकस्मिक नोंद करून पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सर्व सोपास्कार पार पाडून मृतदेह उत्तरीय परिक्षणाकरिता ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे पाठविण्यात आले. कलम १७४ सीआरपीसी नुसार पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश गावंडे करीत आहेत. 

 तर्क वितर्कांना उधाण : -  
मृतक कल्याणी ही मृदुभाषी व मनः मिळाऊ स्वभावाची होती. प्रत्यक्षदर्शी नुसार तिच्या चपला बाजूला काढलेल्या असून तिचे पाय जमिनीला लागलेले दिसून येत असल्याने सदर युवतीची आत्महत्या की हत्या अशा दबक्या आवाजात गावात चर्चा होत आहेत.       


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !