कोविड लसिकरण बहुमाध्यमी जनजागृती व्हॅन सावली मध्ये दाखल.


 कोविड लसिकरण बहुमाध्यमी जनजागृती व्हॅन सावली मध्ये दाखल.

◆ कोरोना लसिकरण व आत्मनिर्भर भारत अभियान जनजागृती मोहिमेला काल पासून सुरूवात.

◆ माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो,पुणेच्या अधिनस्त.

            सुरेश कन्नमवार                                        मुख्य संपादक - एस.के.24 तास

सावली : कोविड-19 लसिकरण आणि आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात  दि. 6/5/2021ला 9.00am ते 6.00pm ते या कालावधीत  ता.सावली येथील .सावली,चकपींरंजी,हिरापूर,बोथली, व्याहाड खुर्द, वीचोरा मोखाडा,सामदा,सोनापूर, व्याहाड बुज,सावली या 10  या ठीकानी आत्मनिर्भर भारत व कोवीड -19लसीकरणा विषयी  जनजागृती महाभियान राबविण्यात आला.सुभेदार रामजी बहुद्देशीय संस्था चंद्रपूर .कलावंत संजय मेकर्तीवार. आशिक गुरनूले.जनजागृती मोहिमेसाठी यांचे सहकार्य लाभले आहे.

माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जागतिक आरोग्य संघटना,युनिसेफ आणि आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले आहे. फिरते बहुमाध्यमी प्रदर्शन आयोजित करून तसेच कलापथकांच्या माध्यमातून लोकांमध्ये कोविड-19 लसिकरण मोहिम आणि आत्मनिर्भर भारत अभियानाबद्दल जनजागृती निर्माण करण्यात येत आहे. 

या उपक्रमांतर्गत लसिकरणाबाबतची माहिती, आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध उपक्रम आणि कोविड-19 विषयक नियमांबाबतची माहिती जिल्ह्यातील नागरीकांपर्यंत पोहचविणे, हा या मागील उद्देश आहे. लसिकरणाविषयी असलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेला जागृत करणे, आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती फिरत्या बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना करून देण्यात येणार आहे.

यावेळी कलापथकातील कलाकारांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सादरीकरण करून लोकांपर्यंत जनजागृती संदेश पोहचविण्यात आला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !