बंटी भाऊ भांगडिया यांचे कडून किराणा किट चे वाटप.
एस.के.24 तास
सावली : ( कमलेश वानखेडे ) आज दिनांक २७/५/२०२१ रोज गुरूवारला मा.नीतिनजी गडकरी केंद्रीय मंत्री यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधुन चिमूर विधानसभा क्षेत्राचे मा.आमदार कीर्ति कुमार उर्फ बंटी भाऊ भांगडिया यांचे तर्फे कोरोनाची भयंकर परिस्थिति लक्षात घेऊन लोकांना रोजगार मिळत नसल्यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून पाथरी येथे चिमूर गड़चिरोली लोकसभा क्षेत्राचे मा.खासदार अशोक भाऊ नेते यांच्या हस्ते गरजू लोकांना ग्राम पंचायत पाथरी येथे किराणा किट चे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी ग्राम पंचायत पाथरी चे सरपंच सौ.अनिता ठीकरे उप सरपंच मा.प्रफुल भाऊ तुम्मे सदस्य सौ.अलका ताई वागधरे सौ.प्रीति लाडे मा.प्रवीण वाघमारे मा.मिलिंद ठीकरे पंचायत समिति सावलीचे माजी उप सभापति मा.तुकाराम पा.ठीकरे मा.शरद सोनवणे पाथरी तालुका निर्माण कृति संघर्ष समिति चे पदाधिकारी मा.नितिन अढिया मा.राकेश चेन्नुरवार उपस्थित होते.