भाऊ धानाचे पैसे मिळाले न.


 भाऊ धानाचे पैसे मिळाले न.

काही दिवसांपूर्वी आमच्या एस.के.24 तास मध्ये "आमच्या धानाचे चुकारे कवा देता जी साहेब " या मथळ्याखाली शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्नाला आले यश.

  नरेंद्र मेश्राम जिल्हा प्रतिनिधी - भंडारा एस.के.24 तास

भंडारा : काही दिवसांपूर्वी आमच्या  एस.के.24 तास मध्ये "आमच्या धानाचे चुकारे कवा देता जी साहेब " या मथळ्याखाली शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न केला होता. खरीप हंगामात मोठ्या मेहनतीने धानाचे उत्पन्न घेतले धान विकण्यासाठी  आधारभूत धान केंद्र धडपड केली .एकदाचा धान विकला पण मे महिना लागून सुद्धा अजून पर्यंत धानाचे चुकारे मिळाले नाही. ही बातमी प्रकाशित होताच शेतकऱ्यांचे कैवारी ,शेती पुत्र, महाराष्ट्र काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांची व्यथा  पाहता बातमीची दखल घेत भंडारा गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे चुकारे मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ यांच्याकडे शेतकऱ्यांच्या धानाचे खरेदीचे 850 कोटी रुपये एवढी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. येत्या सोमवारपासून शेतकऱ्यांना त्याचे वाटप करण्यात येईल. अश्या  बातम्या अनेक दैनिकांमधून आणि नाना पटोले यांच्या फेसबुक पेज वरून धडकत होत्या.


जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान खरेदी केंद्र आहेत. तसेच सोसायट्यांचे देखील धान खरेदी केंद्र आहेत .आज संपूर्ण महाराष्ट्र राज्य कोरोना संसर्गजन्य रोगाच्या महामारी च्या विळख्यात सापडलेला आहे.ही परिस्थिती व्यवसायिक का प्रमाणे शेतकरीही या कठीण परिस्थितीतून जात आहे .शेतकऱ्यांच्या घरामध्ये धान्य आहे. पण किराणा नाही औषधी करीता पैसा नाही मार्च महिन्यात घरातील दागिने सावकाराकडे गहाण करून पीक कर्जाची परतफेड केली .एप्रिल महिन्याच्या एक तारखेला रक्ताचे पाणी करून पिकवलेले धानाच्या मोबदला मिळेल अशी आशा होती.  संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोरोना संसर्गजन्ये रोगाची महामारी सुरू आहे.या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही .साधा ताप जरी आला तरी डॉक्टर चे बिल,औषधी करिता पैसा त्याच्याकडे नाही .पैसा नसल्यामुळे अघटित घटनाही घडू शकते .धान खरेदी केंद्रावर धान विकण्याकरिता धडपड करुनही धान विकला .मात्र मे महिना लागूनही शेतकऱ्याला धानाचे चुकारे मिळाली नाही


शेतकऱ्यांचे कैवारी ,शेती पुत्र, महाराष्ट्र काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे चुकारे मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ यांच्याकडे शेतकऱ्यांच्या धानाचे खरेदीचे 850 कोटी रुपये एवढी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. येत्या सोमवारपासून शेतकऱ्यांना त्याचे वाटप करण्यात येईल.

सोमवारचा दिवस उजाडला शेतकरीराजा बँकेच्या समोर उभा राहून धानाचा मोबदला जमा झाला की नाही. ते बघण्याकरिता उत्सुकता होती .बँकेकडून धानाचा मोबदला जमा झालेला पाहून  त्याच्या चेहऱ्यावर चमक आली .शेतकऱ्याच्या हातामध्ये त्याच्या धानाच्या 

चुकारा मिळाला त्याने मनात भाऊ चे आभार मानले पण भाऊ धानाचे बोनस अजून बाकी आहे. हे विसरता कामा नये.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !