गाव तिथे कोव्हिड सेंटर उभारण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा. - रुपाली मेश्राम


 गाव तिथे कोव्हिड सेंटर उभारण्यासाठी ग्रामपंचायतीने  पुढाकार घ्यावा. - रुपाली मेश्राम

एस.के.24तास

लाखनी : संपूर्ण राज्यासह राज्यातील प्रत्येक गावात कोरोना संसर्गजन्य रोगाची महामारी सुरू आहे.ग्रामीण भागात सध्या परिस्थितीत कोरोना रोगाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गाव तिथे कोव्हिड सेंटर उभारणीसाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा असे रिपब्लिकन सेनेची संघटक रुपाली मेश्राम यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

ग्रामीण भागात सध्या वाढत चाललेल्या कोरोना हा संसर्गजन्य महामारीच्या रुग्णावर लवकरात लवकर उपचार होणे गरजेचे असून उपचारासाठी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या उपयोग कोव्हिड सेंटर म्हणून केल्यास रुग्णालया वरील ताण कमी होईल. तसेच वरून संसर्गजन्य रोगाने ग्रासलेल्या व्यक्तींना तातडीने मदत होईल. रुग्ण गावात राहिले तर त्यांना घरचा डबा व बेड मिळायला अडचण होणार नाही.बेड गावात उपलब्ध झाल्यामुळे गावांमध्ये कमीत कमी खर्चात रुग्णावर प्राथमिक अवस्थेत उपचार होणे गरजेचे आहे.लक्षणे दिसताच कोरोना चाचणी करून औषधोपचार केल्यास कोरोना महामारीच्या रोगाने  ग्रासलेल्या रुग्ण हा पहिल्या  टप्प्यात बरा होईल.या रुग्णा मुळे घरातील बाकी व्यक्तींना कोणत्याच प्रकारचे आर्थिक,मानसिक त्रास होणार नाही आणि त्याच्यामुळे कोरोनाग्रस्त संसर्गजन्य रोगाच्या महामारीच्या फैलाव देखील होणार नाही.यासाठी ग्रामपंचायतींना पुढाकार घ्यावा असे रिपब्लिकन सेनेचे तालुका संघटक रुपाली मेश्राम यांनी सांगितले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !