जनतेला संजीवनी ची गरज असतांना मात्र सरकार देते मदीरा - हरीश शर्मा


 जनतेला संजीवनी ची गरज असतांना मात्र सरकार देते मदीरा - हरीश शर्मा


एस.के.24 तास


बल्लारपूर :  बेड,औषधी,ऑक्सीजन,रुग्णवाहीका, डाॅक्टर,परिचारीका,पिपिई किट,अश्या सर्वच सोयी सुविधा उपलब्ध करुण देण्यात हे सरकार असक्षम ठरले. 


ज्या महाराष्ट्रातील जनतेसाठी शिवछत्रपती राजे शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न साकारण्यात करिता मुघलांविरुद्ध लढा दिला,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीनदुबळ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता संघर्ष केले.


  अश्या महाराष्ट्रात कोरोनाने थैमान असताना  मात्र राज्य शासनाने फक्त हातावर हात ठेवुन बंदीस्त बंगल्यात स्वत:ला सुरक्षीत ठेवले आणि जनतेला वार्‍यावर सोडले.प्राणवायु तर सोडाच साधे रूग्णाला बेड मिळत नसल्याने डोळ्यासमोर स्वकियांचे प्राण जाताना बघत राहण्याची वेळ या महाराष्ट्रातील जनतेवर आली.सर्वात जास्त मृत्यु महाराष्ट्रात झाले.


बेड,औषधी,ऑक्सीजन,रुग्णवाहीका,डाॅक्टर,   परिचारीका, पिपिई किट,अश्या सर्वच सोयी सुविधा उपलब्ध करुण देण्यात हे सरकार असक्षम ठरले.साधे चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना योद्धा म्हणून ज्यांचा सन्मान व्हायला पाहीजे अश्या परिचारीकांच्या वेतनाचा विषयावर बैठकित चर्चा करण्यापेक्षा दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेणार्‍या नाकर्त्या सरकार कडून संजीवनीची आशा बाळगने मुर्खपणाचेच होते.म्हणुन "जनतेला संजीवनी ची गरज असतांना  मात्र सरकार देते मदीरा" असेच म्हणने सार्थ ठरेल. या सरकारचा निषेध करावा कि यांना सद्बुद्धी येण्याकरिता यज्ञ करावे हेच कळेनासे झाले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !