जिबगांव येथे लसीकरणाला सुरूवात,पहिल्याच दिवशी ७४ नागरिकांनी घेतली लस.
- राकेश गोलेपल्लीवार यांच्या मागणीला यश.
एस.के.24 तास
सावली : - तालुक्यातील जिबगांव येथे लसिकरण करण्यात यावे करीता ग्रा.प.सदस्य राकेश गोलेपल्लीवार जिबगांव यानी मागणी केली असता अखेर त्यांच्या मागणीला यश आले असुन आज दिनांक १६ मे रोजी जी. प.शाळा जिबगांव येथे कोविड १९ लसीकरण सत्राचे उदघाटन प.स.सावली चे सभापती श्री विजय कोरेवार याचे हस्ते करण्यात आले तर प्रभारी सरपंच पुरुषोत्तम चुधरी,ग्रा प सदस्य तथा म गां त समीती अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार याचे उपस्थित पार पडले.
त्यावेळी उपस्थित ग्रा.सदस्या सौ,दिक्षा भोयर,सौ,इंदिरा भोयर,सौ,मोनी उंदीरवाडे, वैद्यकिय अधिकारी लोढोली श्री,राजेश पवार,आरोग्य सहायक,जांभुले,आरोग्य सेवक श्री देवकते,चौखुंदे,आरोग्य सेविका सौ.कविता जीवने,सौ आशा पुंकटवार,आशा सेविका मंगला गेडाम,जोत्सना बारसागडे, आशाबाई डांगे, व नागेश बार साकडे,ग्रा प कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थितीत लस देण्यात आली मात्र पहील्याच दिवशी ७४ नागरीकानी लस घेत लसिकरनाला प्रतिसाद दिला नागरीकानी लसिकरण करावे असे आवाहन ग्रा.प.सदस्य,राकेश गोलेपल्लीवार यानी केले आहे.