मुल तालुक्यातील मौजा, चिचाळा येथील खनिज निधि अंतर्गत सुरु असलेले सिमेन्ट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत सदर कामाची उच्चस्तरीय चौकशी करून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
युवा वर्ग मुल निखिल वाढई, प्रणित पाल, आकाश येसनकर, रोहित शेंडे,सुरज गेडाम यांनी निकृष्ट बांधकामाची प्रत्यक्षात पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभाग मुल यांना दिले निवेदन.
नितेश मँकलवार कार्यकारी संपादक - एस.के.24 तास
मुल : तालुक्यातील मौजा चिचाळा हे गाव माजी वित्त व नियोजन पालकमंत्री मान.आदरणीय,सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे विधानसभा क्षेत्रातील आमदार आदर्श गाव मधील एकमेव गाव आहे.त्यांचे कार्यकाळात मंत्री असताना खुप निधि या गावाला दिली,परंतु या गावातील कंत्राटदार हे त्यांचेच पक्ष्याचे असल्यामुळे त्यांच् मनमानी कारभार त्यांचे निष्कृष्ट दरजाचे कामावरुंन दिसून येत आहे.चिचाळा येतील खनिज निधि अंतर्गत श्री डॉ.पद्माकर लेंनगुरे यांच्या घरा पासून ते श्री साईनाथ दुधबले यांच्या घरा पर्यंत चिचाळा ते केवळपेट चिरोली रोड मुख्य मार्ग असलेल्या चिचाळा येथील सुरु असलेल्या काम सदर काम कंट्रक्शन कंपनी चंद्रपूर सदर कंत्राटदार हे काम करित आहे.
सदर कामाची खोलीकरन कमी आहे या बाबत ची तक्रार स्थानिक नागरिकांनी दिली आम्ही युवा वर्ग तालुका मूल चे सर्व पदाधिकारी तिथे जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली असता 17 इंच सदर नाली पासून टाप लेवल वर खोली सदर नाली पासून असायला पाहिजे,परंतु सदर खोदकाम हा 14 इंच 15इंच 11 इंच 13 इंच असस सम्पूर्ण ठिकाणी मोजले असता कमी आढळून आलेला आहे.
GSB 8 इंच टाकून नंतर दबाई करुण 6 इंच बसाला पाहिजे पण अस न होता चिचाळा येथे निकृष्ट दरजेचा रोड बनवत असून तिथं GSB ची दबाई बरोबर झाली नसून अत्यंत खराब काँक्रेट रोड होत आहे,
गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे सुद्धा कामाकडे लक्ष नाही तरी GSB ची दबाई होऊन 6 इंच पाहिजे तर दबाई होऊन फक्त 4 इंच,3 इंच झाली असून ते तिथं रोडचा काम बोगस होत आहे.
नागरिकांची व प्रशासनाची दिशाभूल होताना दिसत आहे. हा काम सदर अभियंता यांच्या मार्गदर्शनात जाणीव पूर्वक आर्थिक व्यवरात होत असून या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी व सदर कंट्राटदारवर योग्य ती कार्यवाही करुण सदर कंत्राटदार ला ब्लॉक लिस्ट मधे टाकून सदर कामाची योग्य तपासणी करुण काम उत्कृष्ट दर्जेचा करुन घ्यावा व नागरिकांना न्याय द्यावा ही नम्र विनंती या सदर कामाची उच्चस्तरीय चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी.
जर संबंधित रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करून तात्काळ संबंधित ठेकेदारावर कारवाई केली नाही तर युवा वर्ग तीव्र आंदोलन करणार व आक्रमक पवित्रा घेणार याला काही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला निवेदन देताना निखिल वाढई,प्रणित पाल, आकाश येसनकर, रोहित शेंडे,सुरज गेडाम, तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.