बँकेचे “ कोरोना नियंत्रणात ” नियोजन सर्व कर्मचाऱ्यांचा मुक्काम पोस्ट बँकेत परीसरात बँकेचे कौतुक.

 बँकेचे “ कोरोना नियंत्रणात ” नियोजन सर्व कर्मचाऱ्यांचा मुक्काम पोस्ट बँकेत परीसरात बँकेचे कौतुक.

              

         सुरेश कन्नमवार                                          मुख्य संपादक - एस.के.24 तास


सावली : सध्या  अख्खे राज्य व जिल्हेही लॉकडाऊनमध्ये अडकलाय. उद्योगधंदे ठप्प झाल्यामुळे अनेकांना, अगदी मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांना पगारही  वेळेवर मिळू शकत नाही आहे, छोट्या  मोठ्या व्यापारी व उद्योजकांचंही नुकसान झालं आहे, निवृत्ती वेतनधारक, श्रावणबाळ योजना, संजयगांधी निराधार योजना, अपंग व वयोवृद्ध लाभार्थी, कामगार व श्रमिक रोजगारांच अशावेळी खिसा रिकामा होणं आणि आर्थिक तंगी जाणवणं हे स्वाभाविक आहे. त्याकरिता वेळोवेळी आर्थिक खर्च मिळण कठीण होत असून त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. परंतु आपल्या श्रमाने कमविलेले आर्थिक पुंजी हि बँकेत जमा करून ठेवण्यात आली आहे. त्यासाठी जीवनावश्यक वस्तू, दवाखाना व औषध, विजबिल, घरकुल बांधकाम मटेरीअल, मोबाईल रीचार्ज, पेट्रोल व डीझेल या सर्व सुविधा करिता येणारा खर्च म्हणून नागरिकांनी जमा केलेल्या आपल्या बँक खात्यामधून रक्कम काढण्या करीता तालुक्यातील व ग्रामीण भागातील बँकेत लोकांची गर्दी पहावयास मिळत आहे. 

       सदर हि बाब लक्षात घेऊन तालुका कोरोना नियंत्रण पथकाचे पदाधिकारी यांनी तालुक्यात व ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर त्वरित योग्य नियोजन करून परिस्थिती नियंत्रित करण्याकरिता मा. तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या मार्गदर्शनात बँकेत आलेल्या लोकांना पैसे उपलब्ध व्हावेत व अतिरिक्त गर्दी कशी टाळता येईल याबाबत व्याहाड खुर्द येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक पंत यांच्याशी चर्चा करून बँकेच्या व्यवहारातील नियमांत बदल करून  अतिरिक्त गर्दी न होता ग्राहकांना सेवा देण्याचे आदेश दिले. 

या आदेशानुसार बँकेचे शाखा व्यवस्थापक पंत यांनी बँकेत सॉंनीटायजर, हॉन्डवाश, मॉस्क, सामाजिक सुरक्षा अंतर, या नियमासोबत त्यांनी लोकांकरिता पेंडॉल, बसण्याकरिता खुर्ची व ताळपत्री ची व्यवस्था तसेच पिण्याच पाण्याची व्यवस्था व फवारणी करत योग्य सेवा दिल्या जात आहे.  सदर या बँकेत एकूण १४ हजारच्या वर नागरिकांचे खाते आहेत त्यामुळे लोकांचे गर्दी टाळण्या करीता बँकेचे शाखा व्यवस्थापक पंत यांनी आठवड्यांचे वारांनुसार गावांचा समावेश करून त्याच गावातील लोकांना रक्कम दिल्या जात आहे.

 तसेच लाउडस्पीकर ची व्यवस्था देखील करण्यात आली असून खातेदारांचे नाव घेऊन त्यांना बोलावून रक्कम दिल्या जात आहे. बँकेच्या या कार्याने परिसरात कौतुक केल्या जात आहे. या बँकेतील कर्मचारी हे सुद्धा योग्य पद्धतीने सेवा देवून तुम्ही आम्हास सहकार्य करा गाव होईल कोरोना मुक्त बरा असे संबोधित करीत आहे. यावेळी बँकेचे कर्मचारी कोरोना नियमाचे पालन करीत बँकेतच मुक्कामाने राहून सेवा देत आहेत.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !