प्रशांत चुधरी एस.के.24 ता तालुका प्रतिनिधी - चामोर्शी मो.नं. 7499716107
चामोर्शी : तालुक्यातील वाघोली येथील तीन मुली वैनगंगा नदीच्या पात्रात डोंग्यावर बसून दुसऱ्या काठावर आंबे तोडण्याकरिता जात असताना डोंगा पलटी झाला.
या 1) सोनी मुखरू शेंडे वय १४ वर्ष वाघोली 2) श्रावणी ढीवरू शेंडे वय १५ वर्ष वाघोली 3)गंगुला विलास भोयर वय १३ वर्ष येवली हि वाघोली येथे आपल्या मामाकडे राहात होती .
या तिन ही मुली दुपारी १२ वाजताच्या सुमारास आंबे तोडण्यास नदीपात्रात डोंग्यावर प्रवास करतांना डोंग्याचा तोल गेल्याने तिनही मुलींना जलसमाधी मिळाली.
डोंगा ( घाटकरी ) केवटराम मनोहर शेन्डे डोंगा पलटी झाली असता त्या नदीतून निघून मुलींना तिथेच सोडून पसार झाला.
घटनास्थळी चामोर्शी पोलीस दाखल झाले.व पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी चामोर्शी नेण्यात आले. घाटकरी केवटराम मनोहर शेन्डे पसार झाले असता त्यांचा शोध घेत आहेत.