पवनी तालुक्यातील परिसरात तेंदूपत्ता संकलनाला सुरुवात.


 पवनी तालुक्यातील परिसरात तेंदूपत्ता संकलनाला सुरुवात.                                       ◆ गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध.

वाघाच्या दहशती मध्ये तेंदूपत्ता संकल्पना सुरुवात.

जीव मुठीत घेऊन करतात तेंदूपत्ता.

एस.के.24 तास

भंडारा : जिल्ह्यातील शेतकरी,गरीब,सर्वसामान्य नागरिकांचे मुख्य आर्थिक स्रोत म्हणून तेंदू हंगामाला पाहिल्या जाते. कमी दिवसात अधिक उत्पन्न देणारा  रोजगार म्हणून तेंदूपत्ता संकलनाच्या कामाकडे पाहिले जाते. पवनी तालुक्यातील भुयार.निष्ठी,वायगाव. शिरसाळा.वाही या.परिसरातील गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला सुरवात झाली आहे. 

राज्यात संचारबंदीचा काळ सुरू असून सर्व सामान्य जनतेला आर्थिक फटका बसला होता. परंतु तेंदू हंगाम सुरू झाल्यामुळे संचारबंदीत  रोजगाराची प्रश्न दूर झाल्याने मजुरामध्ये आनंद दिसत आहे. 

तेंदू हंगामाच्या रक्कमेतून पावसाळ्यात उदरनिर्वाह करिता लागणारा खर्च व  शेती अवजारे, खत पाणी याच रक्कमे तून केले जातात.

 राज्यात कडक निर्बंध व संचारबंदी असल्याने या वर्षी तेंदू हंगाम होणार की नाही असे नागरिकांमध्ये चर्चे सुरू होते.परंतु पेसा अंतर्गत तेंदूपत्ता हंगाम सुरू झाल्याने मजुरामध्ये आनंद निर्माण झाला आहे.

कोरोनामुळे या वर्षी तेंदू हंगाम होणार की नाही असे वाटले  परतु सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच अशोक भाऊ बाळबूधे यांच्या सहकार्याने,तेंदूपत्ता संकलणाचे काम सुरू करण्यात आल्याने गरीब व सर्व सामान्य जनतेला आर्थिक पाठबळ मिळाल्याचं समाधान आहे या रोजगारातुन मिळालेल्या रक्कमेतून शेती चे कामे होऊ शकतात.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !