अवैध रेती चोरी करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर कार्यवाही.

  अवैध रेती चोरी करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर         कार्यवाही.

         सुरेश कन्नमवार                                मुख्य संपादक - एस.के.24 तास

सावली ३० : तालुक्यातील हरांबा साजा येथील तलाठी झिटे यांनी साखरी घाटावरुन रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर पकडून तहसिल कार्यालयात जमा केल्याची घटना नुकतीच घडली. 

ही कार्यवाही तलाठी झिटे यांनी हरांबा इथे आल्यानंतर ची पहिलीच मोठी कार्यवाही आल्याचे समजते आतापर्यंत सदर घाटा वरुण सरास पने रेतीची चोरटी वाहतुकीला उधान आले होते. याकडे कुणाचे लक्ष नसावे परंतु तलाठी झिटे हरांबा साज्याचा पदभार हाती घेतल्या नतर या भागातील गौण खानिज साहित्य चोरी करुण शासनाचा महसूल बुङवीणाऱ्या चोर रेती माफिया विरूद्ध कार्यवाहिची मोहिम राबवून नुकतेच साख़री घाटावरुन रेती वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर पकड़ून कार्यवाही केली.

कोरोनामुळे राज्यात जिल्हाभरात संचारबंदी व लॉकडाऊन चालु असल्यामुळें सर्व प्रशासकीय यंत्रणा कामात लागली आहे. याचाच फायदा घेत रेती तस्करांनी आपल्या गोरखधंदाला सुरुवात केली. या तस्करीबद्दल तलाठी झिटे यांना महिती लागली.

त्यांनी सकळच्या सुमारास साखरी या गावाजवळ रेती वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर पकडून तहसिल कार्यालयात जमा केले आहे. तर पुढील कारवाई तहसील प्रशासन करणार असल्याचे म्हटले जात असुन रेती तस्करी याचे मात्र धाबे धनानले आहेत.तर झीटे याच्या कार्यवाहीचे मात्र परीसरात वाहवाकी होताना दिसुन येत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !