जिल्हा स्वयंरक्तदाता समिती व दीपस्तंभ युवा मंडळ घोडेवाही च्या वतीने घोडेवाही येथे 10 रक्तदात्यानी केले रक्तदान.
एस.के.24 तास
सावली : जिल्हा रक्तपेढीमधील रक्ताचा तुटवडा बघता रक्तदान करण्याचे आवाहन अनेक स्तरावरून करण्यात येते. परंतु वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता रक्तदान करण्यात अनेक रक्तदाते पुढे येतांना दिसत नाही तरुणांमध्ये रक्तदान करण्याकरिता प्रोत्साहित करणे आजच्या घडीला मोलाचे आहे त्यामुळे गडचिरोली ला जिल्हा स्वयंरक्तदाता समिती व दीपस्तंभ युवामंडळ घोडेवाहीच्या वतीने घोडेवाही येथे आज 26 मे रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत घोडेवाही येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात 10 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले आपले कर्तव्य बजावले आहे सदर शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता रक्तपेढी गडचिरोली येथील टीमने सहकार्य केले. यात मनोज शेंडे,बबलू बारसागडे,सुशांत रामटेके, साहिल डोर्लिकर,श्रेयस दुधे,प्रशिक मेश्राम, संघर्ष रामटेके,अक्षय उंडिरवाडे,अर्जित डोंगरे,वैभव रामटेके,सुमेध रामटेके,चेतन रामटेके,आदर्श अलोणे,अविनाश बांबोळे,कुणाल भरडकर,अमित बांबोळे, सूरज रायपूरे,अतुल रायपूरे,संकल्प निमगडे, प्रांजित रामटेके,अमेश डोंगरे,पंकज दुधे,प्रमोद रामटेके, सोनल रामटेके,रोहित खोब्रागडे,बंडू मेश्राम,मयंक दुधे, गुड्डू गोहणे,आदींनी शिबिर यशस्वी करण्याकरिता विशेष सहकार्य केले.भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटना, तालुका सावली चा वतीने संघटनेचे अध्यक्ष,मनोज शेंडे यांनी सुद्धा रक्तदान केले.