सावली-गडचिरोली मार्गावर व्याहाड ( खुर्द ) जवळील चिचबोडी फाट्यावर अपघात.
◆ ट्रकने दिली दुचाकीला धडक; 02 इसमाचा जागीच मृत्यु.
सुरेश कन्नमवार मुख्य संपादक - एस.के.24 तास
सावली : मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सावली - गडचिरोली मार्गावर व्याहाड ( खुर्द ) जवळील चिचबोडी फाट्यावर भीषण अपघात झाल्याची घटना आज रात्रौ. 8.00.वाजता घडली.
ट्रकने दुचाकी एम.एच.34 BE 7261 ला जोरदार धडक दिल्याने 02 इसमाचा जागीच ठार झाले.
तेथील बाळकृष्ण थोराक वय,55 दुमाजी बाबनवाडे वय,40 जांब बुज येथील आहेत.घटनास्थळी पोलिस दाखल झाले.पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी सावली येथे नेण्यात आले.